मीडिया अपडेट्स

वृत्त विशेष आणि घडामोडी

आमच्या चळवळीची दखल घेणारी प्रसारमाध्यमे आणि सामान्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा.

बँक आंदोलन
ठळक बातमी

बँक ऑफ इंडियात राज दादा पार्टे यांचा मराठीसाठी एल्गार; पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी!

बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखेतील अमराठी अधिकाऱ्यांना मराठीतच बोलण्याची तंबी देण्यात आली. तसेच आजारी पेन्शनधारकांच्या घरी जाऊन सर्वे करण्याचे व पेन्शन घरपोच देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळवण्यात आले.

दैनिक लोकमत • २८ डिसेंबर २०२५

ताज्या घडामोडी

महावितरण

सकाळ • ०८ ऑगस्ट २०२५

महावितरण कर्मचाऱ्यांची फसवणूक उघड; 'आपली माती आपली माणसं' कडून तत्काळ कारवाई.

नागरिकांकडून रोख स्वरूपात घेतलेले पैसे भरण्यात न आल्याने वाढलेले व्याज व थकबाकी संस्थेने संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल करून घेतली.

आंबेनळी घाट

पुढारी • २३ ऑगस्ट २०२५

आंबेनळी घाटात एसटी बस सेवा पूर्ववत; खासगी टॅक्सींच्या लूटमारीला चाप.

संस्थेच्या निवेदनाची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घाट सेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

साखर सुतारवाडी

महाराष्ट्र टाइम्स • १० ऑगस्ट २०२५

दरडग्रस्तांच्या हक्काच्या घरांसाठी साखर सुतारवाडीत एल्गार; कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी.

साखर सुतारवाडी व केवणाळे येथील आपत्तीग्रस्तांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी संस्थेचा तीव्र संघर्ष सुरू.

PWD रस्ते

लोकमत • ०५ सप्टें २०२५

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची साफसफाई करा; PWD ला निवेदनाद्वारे इशारा.

वाढलेले गवत आणि चिखलामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले.

दिनदर्शिका

सामना • ०१ जाने २०२६

२०२६ च्या दिनदर्शिकेचे बोरज येथे शानदार प्रकाशन; वारकरी संप्रदायाची उपस्थिती.

सामाजिक जनजागृती आणि संस्थेच्या कार्याची माहिती देणाऱ्या विशेष दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण.

स्वच्छता मोहीम

पुण्यनगरी • १५ जुलै २०२५

पोलादपूर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम; 'सुंदर पोलादपूर'चा जागर.

समाजहितासाठी एक पाऊल उचलताना संस्थेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण एसटी स्टँड परिसर चकाचक केला.