ग्रामीण महाराष्ट्राच्या हक्कासाठी बुलंद आवाज!

न्याय, हक्क आणि सर्वांगीण ग्रामविकासासाठी समर्पित आमची चळवळ.

ग्रामीण महाराष्ट्र
ओळख संस्थेची

"आपली माती आपली माणसं" - एक लोकचळवळ

ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता यावे, यासाठी ही संस्था अहोरात्र कष्ट करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा ग्रामीण आरोग्य, आम्ही मातीशी नातं जोडून काम करतो.

उद्दिष्ट

ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक न्याय.

दृष्टिकोन

प्रत्येक गाव स्वावलंबी आणि समृद्ध बनवणे.

राज पार्टे

मा. श्री. राज पार्टे

संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते

"मातीसाठी आणि माणसांसाठी उभा राहिलेला संघर्ष कधीच व्यर्थ जात नाही."

राज पार्टे यांनी आपल्या संघर्षातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उपोषणे आणि आंदोलने ही केवळ आंदोलने नसून सामान्यांच्या आशा आहेत, असे ते मानतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो गावे आज स्वावलंबी होण्याच्या वाटेवर आहेत.

१५+ आंदोलने
५०+ प्रकल्प

आमचे मुख्य सदस्य

संस्थेच्या कार्याचा कणा असलेले समर्पित सहकारी.

संदीप पाटील

संदीप पाटील

महासचिव

स्वाती देशपांडे

स्वाती देशपांडे

महिला आघाडी प्रमुख

अमोल शिंदे

अमोल शिंदे

युवक संघटक

विजय कदम

विजय कदम

कायदा सल्लागार

महत्त्वाची आंदोलने आणि यश

अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार!

रस्ते सुरक्षा आणि स्वच्छता
२०२५ • नागरी सुविधा

रस्ते सुरक्षा आणि स्वच्छता मागणी

गौरी-गणपती सणापूर्वी तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छतेसाठी PWD विभागाकडे यशस्वी पाठपुरावा.

आंबेनळी घाट बस
२०२५ • सार्वजनिक वाहतूक

आंबेनळी घाट एसटी बस सेवा पूर्ववत

खाजगी टॅक्सी चालकांच्या लूटमारीला चाप लावण्यासाठी एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करून बस सेवा पुन्हा सुरू केली.

आरोग्य विभाग आंदोलन
२०२५ • आरोग्य हक्क

पोलादपूर ग्रामीण रुग्णालय धडक

झोपलेल्या आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी संघटनेचा यशस्वी मोर्चा.

महावितरण आंदोलन
२०२५ • वीज हक्क

महावितरण फसवणूक लढा

कर्मचाऱ्यांकडून झालेली फसवणूक रोखून पैसे वसूल केले आणि अन्यायकारक स्मार्ट मीटरविरोधी यशस्वी लढा उभारला.

दरडग्रस्त पुनर्वसन
२०२५ • पुनर्वसन लढा

दरडग्रस्त गाव पुनर्वसन संघर्ष

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांच्या हक्काच्या घरांसाठी आणि कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पुकारलेला बुलंद लढा.

बँक आंदोलन
२०२६ • जनहित लढा

बँक ऑफ इंडिया जनहित लढा

अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची तंबी आणि आजारी पेन्शनधारकांना घरपोच सेवा मिळवून दिली.

आंदोलनांची झलक

आमच्या फेसबुक पेजवरील काही खास क्षण

थेट फेसबुक पेजवर पहा

समाजकार्य व विधायक उपक्रम

दिनदर्शिका प्रकाशन

दिनदर्शिका (Calendar) प्रकाशन – २०२६

बोरज येथे वारकरी संप्रदाय व मान्यवरांच्या उपस्थितीत २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

एसटी स्टँड स्वच्छता

एस.टी. स्टँड स्वच्छता मोहीम: स्वच्छ पोलादपूर

पोलादपूर एस.टी. स्टँड परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून "स्वच्छ पोलादपूर, सुंदर पोलादपूर" हा संकल्प सिद्ध करण्याचा प्रयत्न.

शिक्षण मदत

विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटप

दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

कार्तिकी वारी आरोग्य शिबिर

कार्तिकी वारी मोफत आरोग्य शिबिर

कापडे येथे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन.

सार्वजनिक शौचालय

सार्वजनिक शौचालय उभारणी संकल्प

पोलादपूर शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शहरात जागा निवडून शौचालय उभारण्याचे महत्त्वाचे पाऊल.

पितळवाडी स्वच्छता

पितळवाडी आरोग्य केंद्र स्वच्छता

पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

संस्थेची दखल (मीडिया कव्हरेज)

बँक आंदोलन बातमी २८ डिसेंबर २०२५ • लोकमत

"बँक ऑफ इंडियात राज दादा पार्टे यांची धडक; अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची तंबी, पेन्शनधारकांचा प्रश्न सोडवला"

महावितरण बातमी ०८ ऑगस्ट २०२५ • दैनिक सकाळ

"महावितरण कर्मचाऱ्यांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक उघड; सामाजिक संघटनेने वसूल केले पैसे"

दरडग्रस्त बातमी १० ऑगस्ट २०२५ • पुढारी

"दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'आपली माती आपली माणसं' सरसावली; साखर सुतारवाडी ग्रामस्थांची घेतली भेट"

सन्मान व गौरव

🏆
समाज भूषण पुरस्कार
🎖️
आदर्श कार्यकर्ता सन्मान
📜
लोक गौरव पुरस्कार

आता बदल घडवण्याची वेळ तुमची आहे!

तुमचे एक पाऊल ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकते. आमच्याशी जोडा.